-
ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच दृष्टिभ्रम हा मेंदूला गुंतवून ठेवणारा आणि मेंदूची खरी कसोटी पाहणारा खेळ.
-
दररोजच्या एकसुरी धावपळीतून काहीतरी वेगळं करायचंय का? तर हे भन्नाट कोडे तुमच्यासाठीच आहे.
-
सध्या सोशल मीडियावर एक असे भन्नाट कोडे जोरदार व्हायरल होतेय.
-
या कोडयामध्ये भरपूर आंब्यांचा ढीग दिसतो; पण त्या आंब्यांच्या ढिगाऱ्यात लपलाय एक पोपट.
-
आव्हान असे आहे की, फक्त १३ सेकंदांत हा पोपट शोधायचा. स्टॉपवॉच सुरू करा आणि सुरू करा तुमची शोधमोहीम.
-
तुम्हाला पोपट सापडला नसेल, तर निराश होऊ नका. खरे तर हे कोडे इतके गुंतागुंतीचे आहे की, कोडी सोडविणाऱ्या मोठमोठ्या बुद्धिमान व्यक्तीदेखील ते सोडविताना बुचकळ्यात पडल्यात.
-
काही टिप्स लक्षात ठेवा : शांतपणे एक दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण लक्ष केंद्रित करा.
-
वेळेचं बंधन विसरा आणि फक्त चित्रावर डोळे खिळवून ठेवा. चित्र झूम करून वेगवेगळ्या अँगलने पाहा.
-
अजूनही सापडला नाही? तर एक गुपित हिंट – पोपटाच्या चोचीवर लक्ष केंद्रित करा.
-
३… २… १… आणि वेळ संपला. मग, तुम्ही शोधलात का? जर शोधलात, तर अभिनंदन! तुमची निरीक्षणशक्ती खरंच कमाल आहे.
-
जर नाही सापडला, तरी हरकत नाही. कारण -हे कोडेच असे आहे की, अनुभवी लोकदेखील ते सोडविताना गोंधळून जातात.
-
आता रहस्य उलगडण्याची वेळ आली आहे. पोपट लपलाय तो आंब्यांच्या ढिगाऱ्याच्या डाव्या वरच्या कोपऱ्यात.
-
कसंय? डोळ्यांसमोर असूनही दिसला नाही ना? म्हणूनच ऑप्टिकल इल्युजन इतके थरारक आणि रोचक वाटते.
-
अशी भन्नाट कोडी रोज सोडवीत राहिलात, तर तुमची नजर आणि मेंदू दोन्ही धारदार होतील.
-
पुढच्या वेळेस कदाचित तुम्हीच वेळ संपण्याच्या आत लपलेलं रहस्य शोधाल. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक