-
Helicopter Fish Fisherman Problem: सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे काठोकाठ भरले आहे. या धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ११७ टीएमसी आहे.
-
सध्या या धरणात हेलिकॉप्टर माशांचा उपद्रव वेगाने वाढत आहे.
-
या माशाची रचना काहीशी हेलिकॉप्टरसारखी दिसत असल्यामुळे त्याला ‘हेलिकॉप्टर मासा’ असे नाव मिळाले आहे.
-
या हेलिकॉप्टर माशांमुळे सोलापूर जिल्ह्यातील मच्छीमारांना खूप त्रास होत आहे.
-
शोभेचा मासा म्हणून घरी पाळले जाणारे हे मासे कालांतराने पाण्यात सोडले जातात.
-
हे मासे गोड्या पाण्यात सहजपणे वाढतात आणि मोठ्या प्रमाणात पसरतात.
-
हा मासा खाण्यास विषारी असतो आणि बाजारात त्याला फारशी मागणी नसते. मासळीखत बनवण्यासाठी काही प्रमाणात त्याचा वापर केला जातो.
-
हेलिकॉप्टर माशांच्या शरीरावरील काटेरी शल्कांमुळे हे मासे जाळ्यात अडकतात आणि जाळ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.
-
हेलिकॉप्टर माशांच्या वाढीमुळे जाळ्यात अडकून जाळी फाटत असल्याच्या तक्रारी उजनीतील अनेक मच्छीमारांनी केल्या आहेत.

CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा मोठा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’