लोकसत्ता वार्ताहर
बारामती : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, आणि शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मला मिळालेली आहे, इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली, दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते दिल्ली मध्ये झाली, या बाबत सध्या उलट सुलट चर्चा चालली असली तरी सत्ताधारी आणि आघाडी या नेत्यांमध्ये सुसंवाद घडत आहे, हेच सुसंस्कृत राजकारणाचे प्रतीक आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या विकासाला जी दिशा दिलेली आहे त्याचे अनुकरण आमच्याकडून होत आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राजकारणामध्ये चर्चा घडत असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुसंवाद घडत असेल तर ही चांगलीच बाब आहे, फक्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून साध्य होत नाही, त्याच्या विचाराची प्रत्यक्षपणे कृतीत आपण आणले पाहिजे तर त्यांचे राजकीय विचार सुद्धा अंमलात आणणे आजही गरजेचे आहे, असे मला वाटते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये विचार विनिमय करूनच आम्ही निर्णय घेणार आहोत, यामध्ये कोणी दुखावला जाणार नाही, या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत, अशा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
दिल्ली येथे रेल्वे अपघातामध्ये चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आहेत , तसेच प्रयागराज येथे चेंगरा चेंगरी मध्ये अनेक जण जखमी झालेत तर काही जण मयत झाले, याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, या अपघातामध्ये रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणे गरजेचे आहे, अशा घटना वारंवार का घडतात, याची चौकशी झाली पाहिजे, अशा घटना का घडता आहेत याच्याकरिता सरकारकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा घटना का घडल्या गेल्या,या संबंधी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील लाडक्या बहीण योजनेबाबत कडक नियमावलीचा वापर केला जात आहे, लाभार्थींचे पुन्हा तपासणी केली जात असून लाभार्थींना वगळण्यात येत आहे, याबाबत विचारणा केली असता सौ. सुळे म्हणाल्या, लाभार्थींना यातून वगळणे हे योग्य नव्हे, आम्ही तर आघाडी करून लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थींना तीन हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते, त्याबाबत नियोजन ही आम्ही तयार केले होते,आता युती सरकारने सत्तेत आल्यानंतर असे फेरबदल करणे अपेक्षित नव्हते, असे मत सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना व्यक्त केले.
© The Indian Express (P) Ltd