दहशतवादी हल्ल्याची कल्पना असल्यामुळेच पंतप्रधानांनी दौरा रद्द केला; खरगेंचा दावा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींना तीन दिवस आधीच गुप्तचर अहवाल मिळाल्याचा दावा केला आहे. खरगे म्हणाले की, पंतप्रधानांनी दौरा रद्द केला, परंतु हल्ला टाळण्यासाठी योग्य उपाययोजना का केल्या नाहीत? सरकारने सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी मान्य केली असून, पुढील काळात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.