महाराष्ट्रात कुठे होणार युद्ध सराव? हल्ल्यापासून बचावासाठी केंद्राने कोणते निर्देश दिले?
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी देशभरात २५९ ठिकाणी युद्धसराव करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, उरण, आणि तारापूर या अतिसंवेदनशील ठिकाणांसह अनेक शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. या सरावात हवाई हल्ल्याचा इशारा, नागरिकांचे स्वसंरक्षण, क्रॅश ब्लॅकआउट, कॅमोफ्लॉज आणि तातडीने स्थलांतर यांचा समावेश असेल. १९७१ नंतर प्रथमच असा सराव होणार आहे.