शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ तारखेपासून इतर आमदारांचा शपथविधी सुरू आहे. अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी ठरलेले आमश्या पाडवी यांनी आज शपथ घेतली, परंतु शपथविधीतील शब्द नीट वाचता न आल्याने त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बाप-लेकीच्या आव्हानात्मक निवडणुकीत आमश्या पाडवी विजयी ठरले होते.