scorecardresearch

कोकण रेल्वे

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More
konkan railway ganesh festival special trains schedule upadate Mumbai
कोकणात जाताय? आरक्षित तिकीटासाठी हे तपासा…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

Waiting list for train in Konkan regret message on website for train reservation Mumbai
कोकणातील रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी हजारापार; अनेक रेल्वेगाड्यांच्या आरक्षणासाठी संकेतस्थळावर ‘रिग्रेट’ संदेश फ्रीमियम स्टोरी

गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील कोकणवासीयांनी कोकणातील गावी जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली असून त्यासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे आरक्षित तिकीट काढण्याची धावपळ सुरू…

Konkan Railway ticket booking news in marathi
कोकणातील चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून २३ जून पासून गणपती स्पेशल आरक्षण

कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकात बदल करुन आता गणपती स्पेशल आरक्षण कोकणातील चाकरमान्यांसाठी सुरु करत आहे.

Konkan Railway updates monsoon news in marathi
कोकणातील रेल्वेगाड्यांचा वेग आजपासून मंदावला… कुठे, किती वेगाने धावणार रेल्वेगाडी…

पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून सुरू झाले असून, कोकणातील रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे प्रवाशांचा प्रवास प्रचंड विलंबाने होण्याची…

ganesh chaturthi festival konkan
कोकण रेल्वे मार्गावर श्री गणेश चतुर्थी सणात ५०० जादा फेऱ्यांची प्रवासी संघटनेने केली मागणी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली आहे.

Konkan railway line expansion patch doubling project
कोकण रेल्वेवर धावणार दुप्पट रेल्वेगाड्या

कोकणवासीयांचा प्रवास वेगवान व्हावा, त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने टप्पा दुहेरीकरण (पॅच डब्लिंग) करण्यावर भर दिला…

parking rate sawantwasi
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्थानकावर नवीन पार्किंग दर लागू; स्थानिक कंत्राटदारांऐवजी आंध्र प्रदेशातील एजन्सीला काम मिळाल्याने नाराजी

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वेच्या ११ स्थानकांवर विमानतळाचा लूक देणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे केली असताना, आता वाहन पार्किंग व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी…

Railway administration decides to reduce Vande Bharat Expresss runs during monsoon
कोकण मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या पावसाळ्यात फेऱ्या कमी करण्याचा निर्णय; कोकण विकास समितीची सहा दिवस गाडी चालविण्याची मागणी नाकारली

सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात यावी, अशी कोकण…

One day special train to be run between CSMT Margao Junction
सीएसएमटी – मडगाव एक दिवसीय विशेष रेल्वेगाडी; प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास होणार मदत

नियमित आणि सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक ०११७१ सीएसएमटी – मडगाव जंक्शन विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

Konkan Railway to start Ro Ro service before Ganeshotsav
गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची कार रो रो सेवा सुरु होणार

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी दिलासा देणारी बातमी आहे.कोकण रेल्वे कडून गणेशोत्सवा पूर्वी रो रो सेवा सुरू केली जाणार आहे.

संबंधित बातम्या