scorecardresearch

मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
Loksatta anvyarth Conflicts continue to persist even after Prime Minister Narendra Modi visit to Manipur
अन्वयार्थ: मोदी-भेटीनंतरचे मणिपूर

वांशिक संघर्षाने होरपळलेल्या मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर भेट दिली. या राज्यात मे २०२३ पासून उफाळलेल्या वांशिक संघर्षात २५० पेक्षा…

Prime Minister Narendra Modi visit to Manipur
‘विकासपुरुष’ मोदींची मणिपूरभेट पुरेशी ठरेल?

‘विकास’ हाच मणिपूरच्या समस्येवर उपाय, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी या अस्वस्थ राज्यास दिलेल्या भेटीतून जरूर दिसला; पण ‘विकासा’च्या या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचार (छायाचित्र पीटीआय)
Manipur Violence : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने; काय आहे कारण?

Manipur Violence Again After PM Modi Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा हिसांचार उफाळल्याचं दिसून आलं. दी…

Prakash Ambedkar on PM Narendra Modi
Prakash Ambedkar : हिंसाचार होत असताना मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधानांना सवाल

Prakash Ambedkar on PM Narendra Modi: हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

मणिपूरमध्ये शांतता, समृद्धीचे लक्ष्य; हिंसाचारापासून दूर राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

विविध संघटनांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन करताना, केंद्र सरकार मणिपूरमधील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी…

pm modi in manipur
10 Photos
PM Modi in North-East today: ७३,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना दाखवला हिरवा झेंडा; मणिपूर हिंसाचारावर केले भाष्य…

PM Modi Manipur Visit : मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष उफाळून आल्यानंतर पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर पोहोचले होते.

PM Modi Manipur Visit
PM Modi Manipur Visit : “तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी…”, पंतप्रधान मोदींचं मणिपूरकरांना शांततेचं आवाहन

PM Modi Manipur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi Manipur visit meets victims of Manipur violence marathi news
PM Modi Manipur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचार उफाळल्यानंतर पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर; घेतली पीडितांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मणिपूर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली.

Narendra modi Manipur visit loksatta article
पंतप्रधान मोदी मणिपूरला आले, म्हणून प्रश्न सुटतील का? प्रीमियम स्टोरी

मोदी येणार आहेत, याचे स्वागतच… त्याच्या भेटीआधी काही करारही झाले आहेत. पण मणिपूरला शांतता प्रदान करू शकणारा ‘न्याय’ विकासाच्या समतोलातून…

Manipur security update, Narendra Modi Manipur visit, Kangla Fort security, Imphal security measures, Churachandpur security,
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ

इम्फाळमधील २३७ एकरवर पसरलेल्या कांगला किल्ल्याभोवती आणि चुराचंदपूरमधील शांतता मैदानाभोवती मोठ्या संख्येने राज्य आणि केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले…

Manipur peace agreement
मणिपूरमध्ये शांततेसाठी करार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासंबंधीच्या घडामोडींना वेग आला आहे.

delhi court acquitted Six accused in Delhi riots
संक्षिप्त : दिल्ली दंगलीतील सहा आरोपी निर्दोष; न्यायालयाचे पोलिसांना खडे बोल

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी सहा आरोपींची सुटका करण्याचा आदेश दिला. २५ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीत उसळलेल्या दंगलीवेळी हे…

संबंधित बातम्या