scorecardresearch

पुणे न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
pune lok sabha marathi news, ravindra dhangekar latest marathi news
पुण्यातील निवडणूक लोकसभा की महानगरपालिकेची ? सर्व उमेदवारांचा भर पालिकेच्या प्रश्नांवरच

वैयक्तिक पातळीवर टीका करत ‘वॉटर, मीटर आणि गटर’ या प्रश्नांवरच बोलण्यावर उमेदवारांनी भर दिल्याने यंदा प्रचाराचा दर्जाही घसरला आहे.

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

नांदेड सिटी परिसरातून बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले.

pune sassoon hospital marathi news
पुणे: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ससूनमध्ये अधीक्षकांचे ‘खुर्चीनाट्य’

डॉ. जाधव हे सोमवारी सकाळी रुग्णालयाची दैनंदिन पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आधीचे अधीक्षक डॉ. तावरे यांनी अधीक्षक कार्यालयात येऊन…

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक

कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने…

baramati tutari marathi news, independent candidate tutari baramati marathi news
बारामतीमध्ये ‘तुतारी’ चिन्हावरून वाद, अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या परवाना नाकारण्याच्या ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना आव्हान दिले आहे.

Katraj area, cricket, firing,
पुणे : क्रिकेट खेळताना वादातून झाला गोळीबार अन्….

कात्रज भागात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गाेळीबार करून पसार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

Khadakwasla, Baramati, Ajit Pawar,
‘बारामती’साठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी, महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवा; अजित पवारांची सूचना

मताधिक्य वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या