scorecardresearch

आर माधवन

आर. माधवन


आर. माधवन (R Madhavan) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अभिनयासह लेखन, दिग्दर्शन देखील करतो. नुकतीच त्याने निर्मिती क्षेत्रामध्येही पदार्पण केले आहे. आर. माधवनचे संपूर्ण नाव रंगनाथन माधवन असे आहे. त्याचा जन्म १ जून १९७० रोजी बिहारमधील जमशेदपूर या ठिकाणी एका तमिळ ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये मोठ्या पदावर कामाला होते. वडिलांच्या नोकरीमुळे माधवनचे कुटुंब जमशेदपूर येथे स्थित होते. माधवनची आई तेथील बॅंकेमध्ये मॅनेजर होत्या. एकूणच माधवनच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला.


जमशेदपूरमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने विज्ञान शाखेमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माधवनने शिष्यवृत्ती मिळवली आणि त्याला कॅनडामध्ये जाऊन भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. शिष्यवृत्तीचा कालावधी पूर्ण झाल्यावर माधवन भारतात परतला. पुढे विज्ञान शाखेच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये पदवी मिळवली. त्याच सुमारास त्याने एनसीसीमध्ये भाग घेतला. पुढे ब्रिटीश सैन्याच्या प्रशिक्षण प्रभागामध्ये सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. मात्र वयाच्या अटीमुळे त्याला प्रशिक्षण घेता आले नाही. कोल्हापूरमध्ये असताना माधवनने व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी तो मुंबईला आला.


मुंबईमध्ये आल्यावर माधवनला मॉडेलिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याने स्वत:चा पोर्टफोलिओ तयार केला. १९९३-९४ मध्ये मॉडेलिंग करण्यासह त्याने अभिनयाची कारकीर्द देखील सुरु झाली. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तो अनेक मालिकांमध्ये झळकला. मालिकांसह माधवन जाहिरातींमध्येही काम करत होता. त्याला हिंदी, मराठी, तमिळ, इंग्रजीसह दक्षिण भारतातील अन्य भाषेचे ज्ञान होते. याचा फायदा त्याला अभिनय क्षेत्रामध्ये झाला. एकाच वेळी तो अनेक भाषांमध्ये काम करु लागला. एका जाहिरातीमध्ये काम करताना माधवनचे काम दिग्दर्शक संतोष शिवन यांना प्रचंड आवडले. संतोष यांनी त्याची शिफारस मणी रत्नम यांच्याकडे केली. तेव्हा मणी सर ‘इरुवर’ (Iruvar) हा चित्रपट बनवत होते. चित्रपटातील मुख्य पात्रासाठी माधवनने ऑडिशन दिली. पण पात्रांच्या तुलनेमध्ये तो अधिक तरुण दिसत असल्याने ती भूमिका मोहनलाल यांच्याकडे गेली.


‘इरुवर’ १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. पुढे लगेच १९९८ मध्ये माधवनने ‘शांती शांती शांती’ या कन्नड चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘इरुवर’च्या वेळी हुकलेली संधी माधवनला ‘आलापयुथेय’च्या (Alaipayuthey) रुपात मिळाली. आर.माधवन आणि शालिनी या फ्रेश जोडीला घेऊन मणी रत्नम यांनी तयार केलेला हा तमिळ चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे माधवनला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. पुढे तो मणी सरांच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला. २००१ मध्ये त्याचा ‘मिनाले’ (Minnale) आला. या चित्रपटामुळे दक्षिण भारतात त्यांची प्रतिमा रोमॅन्टिक हिरो अशी बनली. त्याच वर्षी मिनालेचा हिंदी रिमेक ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यातला ‘मॅडी’ तरुणाईला भावला. आता माधवनचे चाहते दक्षिण भारतासह उत्तर भारतामध्येही तयार झाले.


आर. माधवनने आत्तापर्यंत ‘कन्नाथिल मुथामित्तल’ (Kannathil Muthamittal), ‘रन’, ‘जय जय’, ‘एथिरी’ (Aethirree), ‘विक्रम वेधा’ अशा अनेक सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तो रंग दे बसंती, ३ इंडियट्स, गुरु अशा चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स यांसारखे त्यांचे चित्रपटही हिट ठरले आहेत. माधवनचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट. इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये माधवनने प्रमुख पात्र साकारण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले.


Read More
Shaitaan Box Office Collection Day 3 ajay devgan R. Madhavan shaitaan collected 53 crores
अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाची झाली दणक्यात सुरुवात; तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि याचा प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतोय.

shiataan-trailer
Shaitaan Trailer: जादूटोणा, सस्पेन्स, अन् माधवन-अजय देवगणमधला संघर्ष; काळजाचा ठोका चुकवणारा ‘शैतान’चा ट्रेलर प्रदर्शित

२ मिनिटं २६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये आपल्याला एक थरकाप उडवणारं नाट्य पाहायला मिळत आहे

actor r madhavan takes charge ftii president
पुणे: एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. माधवन यांनी स्वीकारली

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आदिवासींसह विविध समाजघटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

R Madhavan
अभिनेता आर. माधवन FTII चे नवे प्रमुख, अनुराग ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

आर. माधवन हा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे, त्याची निवड FTII च्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

r madhavan
‘द व्हॅक्सिन वॉर’ पाहून आर माधवनने दिली प्रतिक्रिया, विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाबद्दल म्हणाला…

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.

r madhvan
“चांद्रयान ३ यशस्वी होणारच…,” आर. माधवनचं ट्वीट चर्चेत, इस्रो आणि नांबी नारायण यांचं अभिनंदन करत म्हणाला…

भारताचं चंद्रयान ३ हे आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत आहे.

vedant
Video: आर माधवनच्या मुलाचा थाटच न्यारा! थेट चालवली पोर्शे, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

आर माधवनचा मुलगा वेदांत हा सिनेसृष्टीपासून दूर राहून स्विमिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावत आहे.

actor r madhavan shares picture with pm modi and french president Emmanuel Macron
आर माधवनने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह काढलेल्या सेल्फीची चर्चा; फोटो शेअर करत म्हणाला…

आर माधवनने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह शेअर केले खास फोटो

r madhavan
R Madhavan birthday: आर. माधवनचं पूर्ण नाव माहीत आहे का? घ्या जाणून…

आर माधवन या नावाने सर्वजण त्याला ओळखतात. पण त्याचं पूर्ण नाव काय आहे, हे जाणून घेण्याचं सर्वांना कुतूहल आहे.

R madhavan
स्वतःच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला आणि आर माधवन झाला कोल्हापूरचा जावई, जाणून घ्या अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

आर माधवनच्या पत्नीचं नाव सरिता बिरजे आहे.

Rmadhavan-post-about-2000notes
“जणू ३ मृतदेहच…” पेट्रोल पंपावर २००० रुपयांच्या नोटा खर्च करणाऱ्या आर. माधवनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

माधवनने ही स्टोरी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केली आहे

संबंधित बातम्या