scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Nashik Flooding Heavy Rains Godavari River Swells
संततधारेमुळे नाशिकमध्ये १७ धरणांमधून विसर्ग…

सततच्या पावसामुळे नाशिकमधील १७ धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.

konkan farmers worry coconut areca yield drop
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारळ आणि पोफळी बागायतदार चिंतेत…

अवकाळी पावसामुळे भातशेतीसह नारळ आणि सुपारीच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.

ahilyanagar farmers deprived from compensation
मेमधील अवकाळीच्या भरपाईपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी अद्याप वंचित !

सध्या जिल्ह्याच्या दक्षिण भागाला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये किमान लाखभर शेतकरी भरडले गेले.

heavy rainfall
राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार; काही भागांत अतिवृष्टीचा इशारा फ्रीमियम स्टोरी

संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Transport Division becomes independent from Nashik region State Transport Maharashtra
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एसटी सेवेलाही फटका

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर; तसेच धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर परिणाम झाला.

heavy rainfall Maharashtra, Bay of Bengal low pressure, Maharashtra flood forecast, Marathwada rain update, Vidarbha weather forecast,
आत्ताचा पाऊस ओसरत नाही, तोवरच पुन्हा मुसळधारेचा अंदाज… राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत.

लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा भ्रष्टाचार? शरद पवारांचं भाजपावर टीकास्त्र ते फडणवीसांची मदतीची घोषणा; दिवसभरातील घडामोडी...
Top Political News : लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा भ्रष्टाचार? शरद पवारांचं भाजपावर टीकास्त्र ते फडणवीसांची मदतीची घोषणा; दिवसभरातील घडामोडी…

Todays Top Political News : महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

Farmers anger in Tivasat Amravati district
निमंत्रण पत्रिका छापून ६ एकर सोयाबीनवर फिरवला रोटाव्हेटर;शेतकऱ्याचा संताप…

या घटनेमुळे पंचनामे आणि नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने निमंत्रण पत्रिका छापून रोटाव्हेटर फिरवला.

The Indian Meteorological Department has warned of heavy rains
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा;मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय होणार..

२८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान…

heavy rains Maharashtra, vegetable price hike Maharashtra, Marathwada floods impact,
vegetables rate high : पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ

गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Solapur Flood like situation
Solapur Flood News: सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; करमाळा, माढा, मोहोळ येथे पूरस्थिती

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सीना – कोळेगाव, चांदणी, खासापुरी, भोगावती या धरणांतून सोडलेले पाणी येऊन मिसळत आहे.

ahilyanagar agriculture news in marathi
नगर जिल्ह्यातील ४२३ गावांतील ८५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित, १.१६ लाख शेतकऱ्यांना फटका

शनिवारी व रविवारच्या अतिमुसळधार पावसाने काल, सोमवारी दुपारनंतर उघडीप दिली व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक पाहणी केली.

संबंधित बातम्या