scorecardresearch

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Raj Thackeray
Raj Thackeray: सोशल मीडियावर अजिबात व्यक्त व्हायचं नाही! राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर आदेश

Raj Thackeray X Post: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्ते आणि पक्षाच्या प्रवक्त्यांना…

Raj Thackeray Nishikant Dubey Marathi Row
Marathi-Hindi Controversy: “मुंबई महानगरपालिकेत…”, राज ठाकरेंवर मराठी-हिंदी वादावरून निशिकांत दुबेंची पुन्हा टीका; शेअर केली ‘विकिलीक्स’ नोंद

Raj Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकीय फायदा घेण्यासाठी ठाकरे मराठी-हिंदी वाद चिघळवत असल्याचा आरोप भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला…

Raj Thackeray on eknath shinde devendra fadnavis
“मराठी मोर्चावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वाद?” मनसेचं सूचक वक्तव्य; म्हणाले, आंदोलन उग्र झाल्यामुळे…

Marathi Protest in Mira Bhayandar : परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी देणाऱ्या गृहविभागाने मराठी भाषिकांच्या मोर्चाला मात्र परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकांनी…

Devendra Fadnavis On BJP Nishikant Dubey :
Devendra Fadnavis : “तुम्ही आमच्या पैशांवर जगताय”, खासदार दुबेंच्या विधानावर फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मराठी माणसांबाबत…”

निशिकांत दुबे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे.

Devendra Fadnavis On Mira Bhayandar MNS Morcha:
MNS Morcha : मनसेच्या मीरा भाईंदरच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “जाणीवपूर्वक मोर्चाचा…”

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेचे पदाधिकारी मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
Maharashtra Politics : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना ‘ठाकरे बंधू’ का हवेहवेसे? भाषेचा मुद्दा की अस्मितेचा?

DMK support for Shiv Sena : हिंदीविरोधी भूमिका घेतल्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री ए.के स्टॅलिन यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला.

avinash Jadhav police station
मराठी मोर्चा निघण्यापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

मनसे कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्या हिंसेच्या निषेधार्थ २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता.

Thackeray brand unity, Maharashtra political family,
उल्टा चष्मा : ‘आत्याधर्म’पालन! फ्रीमियम स्टोरी

‘ठाकरे ब्रँड’ मजबूत करण्याच्या व्यासपीठावर हजेरी लावून दोन भावंडांमधील ऐक्य आणखी खुलून दिसण्यासाठी केलेली लगबग कामी आली, असा विचार करत…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (छायाचित्र पीटीआय)
Maharashtra Politics : ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काँग्रेसची दुहेरी कोंडी? पक्षातील नेत्यांना कोणती खंत?

Maharashtra Political News : महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचे निमंत्रण पाठवले होते. मात्र, काँग्रेसचा एकही नेता…

After Raj-Uddhav's meeting, the Chief Justice Bhushan Gavai made a big statement about Marathi
राज-उद्धव यांच्या सभेनंतर सरन्यायाधीशांचे मराठीबाबत मोठे विधान, म्हणाले, ‘मराठी भाषा…’

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत याविरोधात सभा घेतली आणि मराठीचा आवाज बुलंद केला. या सभेनंतर…

MLA Sanjay Gaikwad apologizes for his remarks
शिंदेंच्या आमदाराचा यू-टर्ण, म्हणाले “तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो”

मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते.

संबंधित बातम्या