scorecardresearch

विष्णू मनोहर

विष्णू मनोहर हे प्रसिद्ध शेफ आहेत. दूरचित्रवाणीवरील कुकरी शोमध्ये काम केल्याने महाराष्ट्रभर त्यांची ओळख निर्माण झाली. पुढे त्यांनी सलग ५३ तास स्वयंपाक करणे, ‘सर्वात लांब पराठा’ (५ फूट लांब आणि ५ फूट रुंद) बनवणे, तीन तासात ७००० किलोची महामिसळ बनवणे, ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करणे, ३००० किलो खिचडी आणि ५००० किलो खिचडी दलिया बनवण्याचे असे अनेक विश्वविक्रमही केले आहेत. विष्णू मनोहर यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. १९८६ मध्ये त्यांनी या क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी २००८ मध्ये त्यांचे पहिले रेस्टॉरंट सुरू केले. त्यांना पहिल्या दोन रेस्टॉरंटमध्ये अपयश आले, त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि तिसऱ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना यश मिळाले. २००८ पासून १३ वर्षांच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण भारतामध्ये ७ रेस्टॉरंट्स आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये २ रेस्टॉरेंट सुरू केले. याला त्यांनी ‘विष्णूजी की रसोई’ असं नाव दिलं. ते नवी दिल्लीच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या समितीचे सदस्यही बनले. विष्णू मनोहर यांनी ईटीव्ही मराठीवरील “मेजवानी” या शोच्या माध्यमातून ४००० हून अधिक एपिसोड आणि “मास्टर रेसिपीज” शोच्या २००० हून अधिक शोजचं रेकॉर्डही केलं. रेडिओ मिर्ची वरील “सिधे तवा से” आणि विधान भारतीवर “चुल्हा चौका” सारखे कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही त्यांनी केलं. त्यांनी २०१९ मध्ये “वन्स मोअर” नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यातच त्यांनी अभिनयही केला. या चित्रपटात त्यांनी दोन पात्रे साकारली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते/दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘सर सेनापती हंबीरराव’ चित्रपटातही विष्णू मनोहर यांनी भूमिका केली आहे. याशिवाय त्यांनी पाककलेवर अनेक पुस्तकंही लिहिली आहेत.Read More
hef Vishnu Manohar set world record more than seven thousand kg of cereal khichdi Chandrapur guidance of sudhhir mungantiwar
विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात बनवली ७ हजार किलोची खिचडी; मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून विश्वविक्रम!

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल मनोहर यांनी त्यांचे आभारही मानले.

Pune misal
पुणे : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून तयार केली पाच हजार किलो मिसळ

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय…

अबब.. पाच हजार किलोची समरसता भाजी; विष्णू मनोहर यांचा आणखी एक विक्रमी उपक्रम

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवसाच्या  निमित्ताने समरसता दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला जात आहे

chef vishnu manohar will prepare 5 thousand kg of vegetables with the school children of nagpur
नागपूरच्या शाळकरी मुलांसाेबत विष्णू मनोहर तयार करणार ५ हजार किलोंची भाजी; करणार सलग १५ वा विश्वविक्रम

भल्या मोठ्या कढईत फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर करणार आहेत. विशेष म्हणजे मुले पण आपल्या घरून भाजी आणणार आहे.

World Food Day Vishnu Manohar prepare 2 thousand kg Chivda nagpur
जागतिक खाद्यान्न दिनानिमित्त विष्णू मनोहर तयार करणार २ हजार किलोंचा चिवडा

विशेष म्हणजेए हा चिवडा गडचिरोली, मेळघाट येथील दुर्गम भागातील लोकांसाठी पाठवला जाणार आहे.

वाचकांना लवकरच मराठी खाद्यकोशाची मेजवानी

प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती महामंडळातर्फे ८०० पानांचा

विष्णूज् मेन्यू कार्ड : मेरी ख्रिसमस

२५ डिसेंबर दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो – सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. बेकरीमध्ये ख्रिसमसची तयारी एक महिन्यापूर्वी सुरू होते. ड्रायफ्रूट्स रममध्ये…

विष्णूज् मेन्यू कार्ड : शिंगाड्याची गोष्ट

सध्या बाजारात काही ठिकाणी ओले शिंगाडे दिसू लागले आहेत. शिंगाडय़ाचा समावेश फलाहारात होत असला तरी आपल्याकडे शिंगाडय़ाचे पीठ करून त्यापासून…

विष्णूज् मेन्यू कार्ड : द्राक्ष पुराण

द्राक्ष हा निसर्गाचा सर्वात उत्तम मेवा आहे. नेहमीच्या रेसिपीज्मध्ये काही बदल करून वेगळे नावीन्यपूर्ण पदार्थ करण्याकडे माझा नेहमी कल असतो.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×