दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवलेल्या चित्त्यांपैकी एकाचा रविवारी (२३ एप्रिल) मृत्यू झाला. अलिकडेच उदय असे नामकरण करण्यात आलेला हा चित्ता सहा वर्षांचा होता, अशी माहिती वनाधिकाऱ्याने दिली. चित्ता दगावण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. याआधी नामिबियातून आणलेली चित्त्याची मादी साशाचा २७ मार्च रोजी मूत्रिपडाच्या आजाराने मृत्यू झाला होता.