ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
Sharad Pawar Israel Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी केल्यासंदर्भात शरद पवारांनी भूमिका मांडली आहे.
दशकभरातील सरकारचे अपयश लपवण्यासाठी मोदी सरकार आणि भाजप संविधान हत्या दिन पाळण्याचे नाटक करत आहे,’’ अशी परखड टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
India On Iran’s Nuclear Project: इराण विरोधात मतदान करण्यापासून ते गैरहजर राहण्यापर्यंतचा हा बदल, भू-राजकीय संबंध बदलत असताना भारताच्या बदलत्या भूमिकेचे संकेत देत असला तरी, इराणी अणु कार्यक्रमाबद्दल भारताची चिंता स्पष्ट होती.
जग एका प्रकारच्या तणावातून जात आहे, अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे आणि अशा परिस्थितीत योग आपल्याला शांततेची दिशा दाखवतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Israel Iran War Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या, “इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना करणाऱ्या शांततापूर्ण द्वीपक्षीय तोडग्याचं भारताने प्रदीर्घ काळापासून समर्थन केलं आहे. मात्र, नवी दिल्लीने आपल्या तत्वनिष्ठ वचनबद्धतेचा त्याग केल्याचं दिसतंय”.
Iran Appeal India: “ते लोकांना मारतात आणि तरीही पीडित असल्याचा दावा करतात. हे हास्यास्पद आहे. इराण शांततेच्या बाजूने आहे आणि जगात होणाऱ्या कोणत्याही युद्धाला आमचा विरोध आहे”, असे भारतातील इराणच्या उपराजदूतांनी म्हटले आहे.