scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आम आदमी पार्टी

आम आदमी पक्ष (AAP) हा एक राजकीय पक्ष असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी २०११ साली झालेल्या सत्तारूढ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित केंद्र सरकारविरोधातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनंतर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. देशात पंजाब राज्य आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आप पक्षाची सरकार आहे.


दिल्लीची धुरा सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाहत आहेत, तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंतसिंग मान या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.

झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. आप पक्षाने २०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. यात आप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पक्षाने काँग्रेसच्या समर्थनाने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केली होती. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार ४९ दिवसच सत्तेवर राहिले. काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने केजरीवाल यांना विधानसभेमध्ये जन लोकपाल विधेयक मंजूर करता आले नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सत्ता सोडली.


२०१५ च्या निवडणुकीत केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत मिळाले. दिल्ली विधानसभेतील ७० पैकी ६७ जागांवर त्यांना विजय मिळाला आणि केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. विजयाची ही घोडदौड पुढेही सुरू राहिली. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकत आप पक्ष पुन्हा सत्तेवर आला.


दिल्लीच्या बाहेरही आप पक्षाला आपले अस्तित्व निर्माण करता आले. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाने २० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. सध्या आप पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबर निवडणूक लढविली होती. ७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आपने ४ जागांवर तर काँग्रेसने ३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या चार जागांवर आप पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.


Read More
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संदीप पाठक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र पीटीआय)
भाजपामध्ये धुसफूस, निवडणुकीत १२ खासदारांकडून क्रॉस व्होटिंग; संजय पाठक यांचा दावा काय? प्रीमियम स्टोरी

Cross Voting Allegations : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या तब्बल १२ खासदारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले, असा दावा आम आदमी पार्टीचे…

Chandrapur Zilla Parishad Construction Department Engineer's bribe video goes viral on social media
Video : चंद्रपूर बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल…

या व्हिडिओत अभियंता फेंडे कंत्राटदाराकडून २० हजार रुपयाचे पॉकेट घेत असल्याचा आरोप आपने केला आहे.

Bjp leader Shazia Ilmi on aam aadmi party
“मी आम आदमी पक्षात असते तर तुरुंगात असते,” भाजपा नेत्याचा दावा; नक्की काय म्हणाल्या?

BJP Muslim spokesperson पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शाझिया इल्मी या आपल्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत.

पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठानमाजरा याच परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळाले (छायाचित्र पीटीआय)
बलात्काराचा आरोप असलेला आमदार पोलिसांच्या तावडीतून पळाला; कोण आहेत हरमीत पठाणमाजरा?

Harmeet Singh Pathanmajra Arrest : बलात्काराचा आरोप असलेले आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी पोलिसांच्या तावडीतून पलायन केलं.…

AAP MLA Harmeet Singh Pathanmajra rape charges
‘आप’च्या आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक; फिल्मी स्टाईल गोळीबार करत पोलीस ठाण्यातून फरार, स्वतःच्या पक्षावरच केला आरोप

AAP MLA Arrested for Rape case: बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली आप पक्षाचे पंजाबमधील आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांना अटक करण्यात…

progressive parties call protest march in nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची बिकट अवस्था… प्रागतिक पक्ष, जन संघटनांची मोर्चाची हाक!

नाशिकमधील रस्ते, पाणी, आणि इतर समस्यांविरोधात प्रागतिक पक्ष एकवटले.

United for Marathi Language deepak pawar
मराठी भाषक समाज म्हणून ओळख ठळक करण्याची गरज! मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा सवाल…

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.

Aam Aadmi Party holds Sleep Out protest office of Deputy Director of Education in Nagpur
शिक्षण खात्याला जागे करण्यासाठी ‘आप’चे ‘झोपा काढा’ आंदोलन, शिक्षण अधिकाऱ्यांना गजराचे घड्याळ भेट

महाराष्ट्रातील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या महायुती सरकारचे…

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना क्लिनचीट, नेमकं काय होतं हे प्रकरण? भाजपाने एक पाऊल मागे घेतलं?

AAP Satyendra Jain: हे प्रकरण १७ सदस्यांच्या क्रिएटिव्ह टीमच्या भरतीसंदर्भातील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित होतं. ही टीम विविध प्रकल्पांसाठी पीडब्ल्यूडीमध्ये नियुक्त…

Anmol Gagan Maan Resigns As Punjab AAP MLA
आपच्या आमदाराचा राजीनामा, राजकारणालाच रामराम!

AAP MLA Resignation पंजाबच्या खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार आणि पंजाबी गायिका अनमोल गगन मान यांनी राजकारणातून निवृत्तीची…

संबंधित बातम्या