अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. सारांश चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्वतःची अभिनयाची शिक्षण देणारी संस्था आहे. त्यांचा मुलगा सिकंदर खेर हादेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते.Read More
राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित…