scorecardresearch

अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ साली झाला. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते. २०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केले आहे. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१५ आणि २०१९ सालीही आम आदमी पक्षाने दिल्लीत मोठा विजय मिळविला आणि अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीबरोबर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे.


दिल्ली सरकारने करोना काळात नवे अबकारी धोरण आखून त्या माध्यमातून मनी लाँडरींग केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षातील इतर नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. हे धोरण नंतर रद्द केले असले तरी या गुन्ह्याखाली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दीड वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही २१ मार्च २०२४ मध्ये अटक करण्यात आली. लोकसभेदरम्यान पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांना काही दिवसांचा जामीन देण्यात आला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीत प्रवेश केला. मात्र त्यांना केवळ तीनच जागा जिंकता आल्या. आम आदमी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ला एकही जागा जिंकता आली नाही.


ईडीच्या कारवाई आधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. केंद्रीय गृहखात्याने दिल्ली सरकारला असलेले प्रशासकीय अधिकार काढून घेतल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचे अधिकार नायब राज्यपाल यांच्या हाती गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा नवा अध्यादेश काढून आपला निर्णय काम ठेवला.


Read More
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना धक्का, दिल्लीतील १३ नगरसेवकांनी दिला ‘आप’चा राजीनामा अन् केली ‘ही’ मोठी घोषणा

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या १३ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Raja Iqbal Singh
Raja Iqbal Singh : दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेतही कमळ फुललं; राजा इक्बाल सिंह ‘एमसीडी’चे नवे महापौर

दिल्ली विधानसभेनंतर आता महापालिकेतही कमळ फुललं असून आम आदमी पक्षाच्या हातातून दिल्लीची सत्ता गेल्यानंतर आता दिल्ली महानगरपालिकाही ‘आप’च्या हातातून गेली…

Delhi MCD Mayor Election
Delhi MCD Politics : “दिल्ली पालिकेत तुमचीच सत्ता स्थापन करा”, ‘आप’च्या भूमिकेची राजधानीत चर्चा; दिल्लीत नेमकं घडतंय काय?

दिल्ली महापालिकेतील (एमसीडी) महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक वर्षाचा कार्यकाळ असलेल्या निवडणुका २५ एप्रिल रोजी होणार आहेत.

Harshita Kejriwal wedding viral photos
9 Photos
अरविंद केजरीवाल यांच्या मुलीने क्लासमेटशी केलं लग्न, त्यांचा जावई काय करतो? जाणून घ्या

Who is Arvind Kejriwal Son in Law Sambhav Jain : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल विवाहबंधनात…

Arvind Kejriwal Dance
Video: लेकीच्या साखरपुड्यात अरविंद केजरीवाल यांचा पत्नीसह ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

Arvind Kejriwal Dance Video: अरविंद केजरीवाल यांचा जबरदस्त डान्स व्हिडीओ एकदा पाहाच…

Rekha Gupta Husbund PWD DUSIB Officers Meeting
Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे पती सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतायत? फोटो शेअर करत आतिशींचा मोठा दावा

CM Rekha Gupta News : आतिशी म्हणाल्या, “पूर्वी महिला सरपंचांचे पती सरकारी कारभार पाहायचे, आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पती सरकारी अधिकाऱ्यांच्या…

भ्रष्टाचारामुळेच दिल्लीच्या प्रदूषणात आणखी भर, भाजपाने ‘कॅग’ अहवालावरून ‘आप’ला घेरले

दिल्लीत २२.१४ लाख डिझेल वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, १.०८ लाख वाहनांनी प्रदूषण मर्यादा ओलांडलेली असतानाही पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आले.

सत्तांतरानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात दिल्लीकरांना काय काय मिळालं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Budget 2025 : सत्तांतरानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात दिल्लीकरांना काय मिळालं?

Delhi Assembly Budget Session 2025 : सत्तांतरानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात दिल्लीकरांना काय काय मिळालं? सरकारनं कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या? याबाबत सविस्तर…

भाजपा सरकार केजरीवालांच्या ‘शीशमहल’चा शासकीय अतिथीगृह म्हणून वापर करणार?

Sheesh Mahal Delhi : अरविंद केजरीवाल व त्यांच्या कुटुंबाचं २०१५ ते २०२४ पर्यंत या बंगल्यात वास्तव्य होतं.

केजरीवाल आता विपश्यनेत; साधनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री होणार का?

आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी सत्ता गमावल्यानंतर मंगळवारी (४ मार्च) पंजाबला रवाना झाले. दिल्लीतील…

INDIA bloc faces criticism after Delhi election
लाल किल्ला : ‘इंडिया’ बरखास्त झाल्यात जमा? प्रीमियम स्टोरी

नजीकच्या भविष्यात काँग्रेस ‘एकला चलो रे’चा जाहीर नारा देईल असे नव्हे; पण काँग्रेसची कृती कदाचित तशी असू शकते असे म्हणायला…

Latest National News in Marathi
चांदनी चौकातून : तेरा कुछ सामान…

केजरीवाल अजून तरी विजनवासात आहेत, ते बाहेर आले की पहिला हल्लाबोल कोणावर करतात याची प्रतीक्षा ‘आप’च्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असेल.

संबंधित बातम्या