भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
‘प्रधानमंत्री स्कीलिंग अँड एम्लॉयेबिलिटी ट्रान्सफर्मेशन थ्रू अपडेटेड आयटीआय’ (पीएम-सेतू) या उपक्रमाअंतर्गत ६२ हजार कोटींची तरतूद करून या योजना आखण्यात आल्या…