भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांची फेरपडताळणी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मतदारांना ओळखपत्र सादर करून आपल्या वास्तव्याचा दाखला द्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने रक्त संक्रमण सेवेंतर्गत राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला…
मुंबई महानगरपालिकेच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारची पर्यावरणीय मंजूरी मिळाली असून लवकरच उच्च न्यायालयातून परवानगी आणि कार्यारंभाची परवानगी मिळवण्यात येणार आहे.
छोट्या विमानांची सेवा शिवणीवरून सुरू करण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १९४३ मध्ये शिवणी विमानतळाची उभारणी…
भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गाजवळून मुंबई वडोदरा महामार्ग जातो. परंतु…