scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner

चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे हे महाराष्ट्रातील राजकीय नेते असून त्यांचा जन्म १ जानेवारी १९५२ रोजी औरंगाबाद ( आताचे छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यात झाला. त्यांनी १२ पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे. राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता ते उद्योगपती अशी चंद्रकांत खैरे यांची ओळख आहे. चंद्रकांत खैरे यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते होते.


चंद्रकांत खैरे यांनी १९८५ मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. १९८५ साली त्यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली. १९९० मध्ये त्यांनी औरंगाबाद पश्चिममधून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा २९ हजार १५५ मतांनी विजय झाला. १९९५ मध्ये ते पुन्हा एकदा आमदार झाले. तसेच १९९७ साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले.


पुढे १९९९ साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा पराभव केला. १९९९ ते २०१९ यादरम्यान, सलग चार वेळा औरंगाबादचे खासदार होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा परावभ झाला. चंद्रकांत खैरे सक्रीय राजकारणात असून ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत.


Read More
Chandrakant Khaire blames Ambadas Danve
“त्यांना काहीतरी भवितव्य गाठायचं असेल म्हणून…”, पराभवानंतर चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर टीका, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

त्यांना काहीतरी भवितव्य गाठायचं असेल म्हणून कदाचित ते तसं वागले असतील, अशी टीका चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंवर केली आहे.

ठाकरे संपले म्हणणाऱ्यांना थप्पड बसली; माजी खासदार असे का म्हणाले?

Uddhav Thackeray and Raj Thackeray News : महाराष्ट्रातून ठाकरे संपले असे म्हणणाऱ्यांना आजच्या निकालामुळे थप्पड बसली आहे, असे माजी खासदाराने…

चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे (छायाचित्र संग्रहित)
…तर दानवेंना सरळ करून टाकेन; निकालाआधीच ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपली, कारण काय?

Chandrakant Khaire VS Ambadas Danve : चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना थेट सरळ करून टाकण्याची भाषा वापरली आहे.

Ambadas Danve Chandrakant Khaire controversy, Shivsena controversy, Rashid Mamu Shiv Sena entry, Chandrakant Khaire allegations, Shiv Sena municipal elections, Uddhav Thackeray Shiv Sena,
रशीद मामूच्या उमेदवारीनंतर चंद्रकांत खैरे शिवसेनेवर नाराज…उमेदवारीवर अंबादास दानवे यांचा वरचष्मा

माजी महापौर रशीद मामू यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर ‘ मामू सेना’ अशी टीका झाली. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आल्याने शिवसेना…

Ambadas Danve Chandrakant Khaire controversy, Shivsena controversy, Rashid Mamu Shiv Sena entry, Chandrakant Khaire allegations, Shiv Sena municipal elections, Uddhav Thackeray Shiv Sena,
‘मामू प्रवेशा’मुळे शिवसेनेमध्ये वादंग, खैरे – दानवे वाद पुन्हा उघड, ५० हजार हिंदू मते वजा झाल्याचा खैरे यांचा दावा

माजी महापौर रशीद मामू यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

chhatrapati sambhajinagar elections
छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या नेत्यांची मुले उतरणार निवडणुकीच्या रिंगणात ?

सर्वच पक्षांमधील नेत्यांकडून आपल्या घरातील मुलगा, मुलगी, भाऊ अशा सदस्यांना उमेदवारी मिळवून देण्याची तयारी असून, त्या दृष्टीने इच्छित प्रभागांमध्ये काम…

chandrakant Khaires statement regarding the Thackeray group and MNS alliance talks Aditya Thackeray gave a reaction
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चेबाबत खैरेंचं वक्तव्य; आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे…

Discussion on alliance between MNS and Thackeray group chandrakant khaire gave a reaction
Chandrakant Khaire : मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; खैरे म्हणाले,”परब आणि राऊतांवर जबाबदारी..”

Chandrakant Khaire: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना…

shiv sena thackeray group agitation chhatrapati sambhaji nagar water issue
पाच घागरीचे तोरण आणि ५० कार्यकर्ते, शिवसेनेचे ‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलन

‘लबाडांनो पाणी द्या’ असे फलक असणाऱ्या दोरीला घागरी बांधून शिवसेनेकडून विस्कटलेल्या संघटनेत पुन्हा चेतना भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Chandrakant Khaire On Ambadas Danve
Chandrakant Khaire : ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर? “ते फक्त काड्या करतात”, चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंवर संतापले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Chandrakant Khaire offer to join Shiv Sena
चंद्रकांत खैरे शिंदे गटाचे निमंत्रण स्वीकारणार का ?

अंबादास दानवे यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांची भूमिका बरोबर असून दानवे जेव्हापासून जिल्हाप्रमुख झाले तेव्हापासून शिवसेना घसरणीलाच लागली.

संबंधित बातम्या