Chandrakant Khaire : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या विरोधात टीका-टिप्पणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (११ जानेवारी) मोठी घोषणा केली. शिवसेना ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी मेळावे आणि बैठका घेण्यात येत आहे. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठे धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे गटाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका, असं म्हणत हात जोडून विनंती करत व्यासपीठावरच कार्यकर्त्यांना दंडवत घातलं.

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

हेही वाचा : सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपल्याला आगामी महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहोत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुम्हाला येथे दंडवत घालतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला पहायचं आहे. आता परवाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे किती कळकळून बोलले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, कुठेही सोडून जाऊ नका. आपण सर्वजण एकत्र मिळून अधिक चांगलं काम करू. समजा माझं काही चुकलं तर मला तुम्ही बोलले तरी काही हरकत नाही. पण माझी विनंती आहे की तुम्ही थांबा कुठेही जाऊ नका”, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत घातलं.

Story img Loader