अॅस्ट्राझेनेकाने लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली दिल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग एका मृत मुलीच्या पालकांनी निवडला आहे.
ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या करोनावरील लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे.