फुटबॉल (Football) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलला काही देशांमध्ये सॉकर असेही म्हटले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडूंचा समावेश असतो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ ठराविक वेळेमध्ये सर्वाधिक गोल करतो, तो संघ विजेता ठरतो.
भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी हा खेळ पोहोचला. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो.
भारतामध्ये या खेळाचे महत्त्व वाढावे आणि चांगले फुटबॉलपटू आपल्या देशामधून यावेत यासाठी १९३७ साली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. फिफा, कोपा अमेरिका या फुटबॉलच्या काही स्पर्धा जगभरामध्ये फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये फुटबॉलची मोठी क्रेझ पाहायला मिळते.Read More
खेळाडूंच्या स्वास्थ्याविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) निष्काळजी असून, त्यांना खेळाडूंची चिंता नसल्याची टीकाही मोहन बागान क्लबच्या व्यवस्थापनाने केली आहे.
लिओनेल मेसीप्रमाणेच तारांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही या वर्षी भारतात येण्याची शक्यता आहे. ‘एएफसी चॅम्पियन्स लीग-२’च्या आगामी हंगामासाठीची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी क्वालालम्पूर…
नियमित वेळ आणि ‘पेनल्टी शूटआउट’मध्ये दोन गोलच्या पिछाडीनंतरही दमदार पुनरागमन करताना पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल संघाने टॉटनहॅमला पराभूत करत ‘युएफा सुपर चषका’चे…
भारतीय फुटबॉलमध्ये आधीच अनिश्चितता असताना देशातील अव्वल दर्जाची ‘आयएसएल’ स्पर्धा स्थगित केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाल्याची टिप्पणी राष्ट्रीय संघाचा माजी…