१९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा (Haryana) राज्य वेगळे करण्यात आले. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा (Haryana) या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी आहे. या राज्यामध्ये मैदानी खेळांचे प्रमाण जास्त आहे. तेथील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रातिनिधित्व केले आहे. गहू, ज्वारी या धान्याची येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. तसेच ऊसाच्या पिकासाठीही हरियाणा राज्याचे हवामान पूरक आहे. हे राज्य १९ जिल्ह्यांनी तयार झाले आहे.
ज्या रणभूमीवर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झाले ती कुरुक्षेत्राची भूमी या राज्यामध्ये आहे. येथे सुरुवातीच्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. २०१४ मध्ये तेथील राजकारणाची स्थिती बदलली आणि बहुमत मिळाल्याने तेव्हापासून भारतीय जनचा पक्षाचे मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. Read More
Maharshi Dayanand University Case: हरियाणामधील विद्यापीठात दोन महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान पर्यवेक्षकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधित अकरा जणांना अमरावतीतील परतवाडा येथून मुंबई, हरियाणा, नागपूर आणि अमरावती संयुक्त पोलीस पथकाने अत्यंत गोपनीय कारवाईत…