करिश्मा कपूर ही १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळातहिंदी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून दर्जा मिळू लागला. तिने वयाच्या १७ व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास दशकभर रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर तिने एका उद्योगपतीशी लग्न केले आणि २००३ मध्ये बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडं प्रस्थ असलेल्या कपूर खानदानात जन्म घेऊनही तिचे आयुष्य कधीच सोपे नव्हते. करिश्माला प्रेमाने लोलो म्हटले जाते जे तिचे टोपणनाव आहे. तिचे टोपणनाव हॉलिवूड अभिनेत्री “जीना लोलोब्रिगिडा” वरून पडले आहे. करिश्माचे वडील अभिनेता रणधीर कपूर हे पंजाबी कुटुंबातील आहेत, तर तिची आई बबिता सिंधी कुटुंबातील आहे.Read More
Sanjay Kapoor Death: संजय कपूर यांचे जूनमध्ये इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये…