भारतामधील आठ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमत असतात. त्यातही महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.
महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.
केदार (Kedar) हे भगवान शंकराचे नाव आहे. त्यातल्या केदार शब्दाचा अर्थ जमीन, शेती किंवा भूमीशी लावला जातो आणि नाथ या शब्दाचा वापर स्वामी किंवा रक्षक या अर्थाने केलेला आढळतो. २०१३ मध्ये या ठिकाणी महापूर आला होता. त्यावेळी तेथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती.Read More
उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यात आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत जिल्ह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. राजकुमार…
केदारनाथहून गुप्तकाशीला जाणारं हेलिकॉप्टर रविवारी सकाळी गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा…
Kedarnath Helicopter: उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित हेलिकॉप्टर क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात…