scorecardresearch

मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
India alliance to field joint candidate for Vice Presidential election
‘इंडिया’चा संयुक्त उमेदवार? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडी संयुक्त उमेदवार देणार असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षांशी संपर्क…

संसदेच्या सुरक्षेत बदल का करण्यात आले? मल्लिकार्जुन खरगेंनी सीआयएसएफविरोधात नेमके काय आरोप केले?

संसदेच्या सत्रादरम्यान सुमारे ८०० खासदार, इतर मान्यवर, अधिकारी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित असतात, त्यामुळे तिथे दक्ष, अनुभवी आणि संवेदनशील सुरक्षा…

congress Mallikarjun kharge operation sindoor
पंतप्रधान गप्प का? ट्रम्प यांच्या दाव्यांवरून खरगे यांची विचारणा

आपल्या उपजीविकेसाठी आपला देश विकण्यास तयार असलेली व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला कोण पाठिंबा देत आहे, असा प्रश्न खरगेंनी केला.

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “..आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडलीच नाही”; मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेला किस्सा चर्चेत

Mallikarjun Kharge : विजयपूर येथील कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगेंनी हा किस्सा सांगितला जो चांगलाच चर्चेत आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी व जम्मू-काश्मीरचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा (छायाचित्र X/@TariqKarra)
काँग्रेस पुन्हा दुभंगणार? पक्षात फूट पडल्याची का होतेय चर्चा?

Congress Split News : काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला सत्तासंघर्ष उघड, नेमकं काय घडलं?

सिद्धरामय्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा नेतृत्वबदलाबद्दल आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा असावा, असं काहींना वाटत आहे. असं असताना काँग्रेस…

maharashtra sadan delhi cultural event and political undertones
चांदणी चौकातून : महाराष्ट्र सदन कोणाची जागीर? प्रीमियम स्टोरी

नवीन महाराष्ट्र सदन म्हणजे सत्ताधारी संस्था, संघटना, त्यांच्या मर्जीतील कंपन्या यांच्यासाठी गुळाची ढेप झाली आहे. सतत या गुळाला मुंग्या लागलेल्या…

Mallikarjun Kharge news in marathi
देशात मोदी सरकारची अघोषित आणीबाणी : खरगे

दशकभरातील सरकारचे अपयश लपवण्यासाठी मोदी सरकार आणि भाजप संविधान हत्या दिन पाळण्याचे नाटक करत आहे,’’ अशी परखड टीका काँग्रेसचे राष्ट्रीय…

Will Shashi Tharoor join BJP
शशी थरूर भाजपात जाणार? ही चर्चा का होतेय? स्वतःच स्पष्ट केली भूमिका

Shashi Tharoor praises Narendra modi शशी थरूर यांनी इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांचे कौतुक केले. त्यानंतर शशी थरूर भाजपात सामील…

Shashi Tharoor cryptic post after Mallikarjun Kharge Comment
Shashi Tharoor : ‘काही लोकांसाठी मोदी प्रथम’, खरगेंच्या विधानानंतर शशी थरूर यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “उडण्यासाठी परवानगी…” फ्रीमियम स्टोरी

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली, युद्धाचं धुकं…”, संरक्षण दलप्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मल्लिकार्जुन खर्गेंनी सरकारला घेरलं

व्यापक धोरणात्मक आढावा घेण्याची गरज असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या