scorecardresearch

मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
Maratha leader Manoj Jarange stay in Nanded forces minister Atul Save to shift to hotel
नांदेड : जरांगे शासकीय विश्रामगृहात; सावेंचा मुक्काम हॉटेलमध्ये !

मनोज जरांगे त्याचदिवशी वरील विश्रामगृहालगतच्या दुसर्‍या विश्रामगृहामध्ये मुक्कामी असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहाकडे येण्याचे टाळल्याची माहिती आता समोर आली…

गणेशोत्सवात मनोज जरांगे यांचा मुंबईत मोर्चा; गर्दीमुळे ताण वाढण्याची शक्यता, तोडगा काढण्याची मागणी

यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र याच कालावधीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील…

Radhakrishna vikhe patil
फडणवीसांवर टीका करून आरक्षण मिळणार का? मंत्री राधाकृष्ण विखे यांचा मनोज जरांगे यांना सवाल

फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. ते न्यायालयात टीकवण्याचेही काम करण्यात आले.

Manoj Jarange warns Ajit Pawar about Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास अजितदादांचा पक्षच संपेल; मनोज जरांगे यांचा इशारा

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून, प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे. अजितदादांकडे बीडचे पालकमंत्रिपद आहे, तरीही गुन्हेगारी थांबण्याऐवजी…

Jarange held a program to build the movement in Mumbai on August 29
ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर राजकीय आरक्षणही वापरणारच; मनोज जरांगे यांचा दावा

२९ ऑगस्ट रोजी मुंबई येथील आंदोलनाच्या बांधणीसाठी जरांगे यांनी बुधवारी धाराशिव जिल्ह्यात कार्यक्रम घेतले.

Manoj Jarange Patil Lift Fall Down
Manoj Jarange Patil: लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली आणि मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; कुठे झाला अपघात?

Manoj Jarange Patil Lift Fall Down: बीड जिल्ह्यात एका रुग्णालयात गेले असताना मनोज जरांगे पाटील सहकाऱ्यांसह लिफ्टमध्ये असताना लिफ्ट कोसळली.

manoj jarange protest over maratha aarakshan mumbai
Manoj Jarange Patil: आता आरपारची लढाई, जरांगे पाटलांचा निर्धार

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी…

issue of Kunbi certificates for relatives
‘सगेसोयरे’ना मातृसत्ताक पद्धतीने आरक्षण लाभ नाही; राज्य सरकारची भूमिका, अंतिम अधिसूचना प्रलंबितच

मराठा समाजातील ज्या व्यक्तींकडे पुरावे असतील, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता

संबंधित बातम्या