scorecardresearch

पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhansabha) हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाद्वारे राज्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, राज्यातील विविध प्रश्नांवर, गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाद्वारे केलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी, राज्यहितासाठी आवश्यक असलेली नवीन धोरणे राबवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी विधानसभेद्वारे वर्षामध्ये तीन वेळा अधिवेशनाचे नियोजन केले जाते.


उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ३ ऋतुंच्या वर्गीकरणाप्रमाणे उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे प्रकार पडतात. त्यातील उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पार पाडले जाते. तर हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनीही बंडाची भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी सांभाळणारे अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता विरोध पक्ष नेता कोण असा प्रश्न विरोधी पक्ष गटातील नेत्यांना पडला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज सुरु होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली.


विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा सोडल्यास अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील प्रचारांनी गाजले. या व्यतिरिक्त जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ, सहकारी संस्थांमध्ये सदस्याच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसुदा सादर करण्याच्या कालावधीत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, मुंबई महापालिका सुधारणा, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, ललित कला शिक्षण मंडळ विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपले.


Read More
Indian Parliament Dress Code, MPs traditional attire India
9 Photos
कंगणा रणौत ते प्रियंका चतुर्वेदी; संसदेत खासदार नेहमी पारंपरिक लूकमध्ये का दिसतात? त्यांना ड्रेस कोड लागू आहे का?

संसदेत महिला खासदार साडी किंवा सूटमध्ये दिसतात, तर पुरुष खासदार देखील भारतीय पोशाखात दिसतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे…

Former MNS MLA Raju Patil's question regarding Navi Mumbai Airport
नवी मुंबई विमानतळासाठी हजार कोटींची कंत्राटे नेमकी कुणासाठी? मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल….

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ मामा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार,…

asaduddin owaisi operation sindoor ceasefire
Video: अंकल सॅम, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रविराम; असदुद्दीन ओवैसी म्हणतात, “चाचा सॅमला राजी करा व पाकिस्तानला…”

Asaduddin Owaisi on Operation Sindoor: असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत अमेरिकेचा ‘अंकल सॅम’ म्हणून उल्लेख करत मोदी सरकारवर टीकास्र सोडलं.

India-Pakistan Ceasefire Rajnath Singh
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचा शस्त्रविरामाचा प्रस्ताव भारताने कोणत्या अटींवर स्वीकारला? राजनाथ सिंह ठणकावत म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”

India-Pakistan Ceasefire: राजनाथ सिंह यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले की, “भारताने आता सुदर्शन चक्र उचलले आहे, आता शांत बसणार नाही.”

Gaurav Gogoi
“ट्रम्प २६ वेळा म्हणाले, मी युद्ध थांबवलं, पण मोदी गप्प का?” विरोधकांनी संसदेत मांडले महत्त्वाचे प्रश्न

Gaurav Gogoi Lok Sabha Speech : गोगोई म्हणाले,”पहलगाममधील हल्ल्यानंतर आम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं होतं. पण त्यांनी…

Farmers staged a sit in protest at the bus stand in Yavatmal
कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर; हातात पत्ते, चक्काजाम !

यवतमाळ येथे बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत कशेतकऱ्यांनी सरकारविरुध्द आपला संताप व्यक्त केला. यावेळी पत्ते खेळून शासनाचा…

The ST Corporation's concerns have increased... The RTO department is also desperate
‘एसटी’ महामंडळाची चिंता वाढली…हा विभागही हतबल…

‘एसटी’च्या वेगवेगळ्या स्थानकांच्या आवारात ‘आरटीओ’ने जप्त केलेली २९३ खासगी वाहने अनेक महिन्यांपासून धूळखात पडून असल्याने महामंडळाच्या बस उभ्या करण्यासाठी जागा…

Officer union opposes suspensions without proof during assembly session mumbai maharashtra
चौकशीशिवाय निलंबनाची कारवाई, अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारी; विधिमंडळातीलफ घाऊक निलबंनावर संघटनांचे आक्षेप

कारवाईपूर्वी नैसर्गिक न्याय तत्वानुसार भूमिका मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

manikrao kokate net worth
10 Photos
Manikrao Kokate Net Worth: थेट विधानसभेत रमी; व्हिडिओत दिसणारे माणिकराव कोकाटे कोट्यधीश; वाचा मालमत्तेची माहिती

Manikrao Kokate Net Worth: पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहातील बाकावर बसून ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्यामुळे प्रचंड चर्चेत…

series of burglaries in nine places in the suburb of Kharghar
खारघर येथील चोरीचे सत्र थांबेना…

खारघर उपनगरात जुलै महिन्यात एका रात्री तब्बल ९ ठिकाणी झालेल्या घरफोडीनंतर खारघरच्या सूरक्षेविषयीचा प्रश्न पावसाळी आधिवेशनात भाजपच्या आमदारांनी मांडला.

Vice President of India Jagdeep Dhankhar Resignation Reason
Jagdeep Dhankhar Resignation : उपराष्ट्रपतींनी तडकाफडकी राजीनामा का दिला? ‘त्या’ साडेतीन तासांत काय घडलं?

Vice President of India Jagdeep Dhankhar Resignation : सोमवारी दुपारी अधिवेशन सुरू असताना सभागृहात नेमकं काय घडलं? उपराष्ट्रपतींनी तडकाफडकी राजीनामा…

संबंधित बातम्या