ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
भारताचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा कारवाई करून अद्दल घडवू, असा घणाघाती प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत केला.
आम्ही रामटेक ते दीक्षाभूमी (नागपूर) ‘सिंदूर यात्रा’ काढणार, दुसरी यात्रा मराठवाड्यात, हिंगोली ते नांदेड काढणार आहोत, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.