परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेतली असून वरपूडकर हे लवकरच भारतीय…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या संशोधन केंद्राचे विस्तारीकरण करण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे…
एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात अर्भक फेकल्याचे निदर्शनास येताच प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना ही बाब कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने पाठलाग केला. ही घटना…