रमणदीप सिंग (Ramandeep Singh) हा भारतीय फलंदाज आहे. जानेवारी २०१७ मध्ये इंटरस्टेट टी-२० टूर्नामेंटमध्ये पंजाबच्या संथामध्ये त्याला सहभागी करण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळायची संधी मिळाली. त्यानंतर रमणदीप रणजी ट्रॉफीमध्येही अनेक सामने खेळला. या दोन्हींमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.
राज्यस्तरीय पातळीवरील त्याची कामगिरी पाहून त्याला इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामामध्ये सामील करण्यात आले. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. या हंगामामध्ये चांगला खेळ करत तो प्रकाशझोतात आला. आयपीएल २०२३ मध्येही तो गतवर्षीप्रमाणे खेळ करेल असा मुंबईच्या चाहत्यांना विश्वास आहे. Read More
सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे केंद्राच्या योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होत नाही. मात्र, आता विमानतळावर कार्गो…
पालिकेने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत ९ प्रभागात ८७ फेरीवाला झोन (Hokers Zone)तात्पुरता स्वरूपात तयार करण्यात आले आहेत.