आयपीएल २०२३ (IPL 2023) ची लवकरच सुरुवात होणार आहे. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये या लीगवर करोना महामारीचा प्रभाव पडला. सुरक्षेच्या कारणांमुळे २०२१ मध्ये आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये (UAE) खेळले गेले. तर २०२२ मध्ये मुंबई, पुणे या दोन शहरांमधील स्टेडिअम्समध्ये आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले.