scorecardresearch

IPL 2023 Teams

टाटा आयपीएल २०२३ मध्ये प्रत्येक संघ होम ग्राऊंडवर ७ आणि बाहेरच्या स्टेडिअमवर ७ असे एकूण १४ सामने खेळणार आहे. यामुळे सर्व संघाना घरच्या मैदानामध्ये खेळ खेळण्याचा फायदा होणार आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही आयपीएलच्या १० संघांचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या नियमानुसार, मुंबई, लखनऊ, कोलकाता, राजस्थान आणि दिल्ली हे ५ संघ एका गटामध्ये, तर चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात हे ५ संघ दुसऱ्या गटामध्ये असणार आहेत. मार्च महिन्याच्या शेवटी आयपीएलच्या १६ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

५२ दिवस सुरु राहणाऱ्या या फ्रेंचायझी क्रिकेट लीगचा अंतिम सामना २८ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे.