शिखर धवन (Shikhar Dhawan) हा भारताचा सलामीवीर फलंदाज आहे. तो गब्बर या नावाने प्रसिद्ध आहे. ५ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला. २००४ मध्ये त्याने अंडर-१९ विश्वचषकामध्ये ३ शतक करत ५०५ धावा केल्या होत्या. या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०१० मध्ये त्याचा समावेश भारतीय संघामध्ये करण्यात आला.
पुढे तीन वर्षांनंतर त्याने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने कसोटी सामन्यांमध्ये २३१५, एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७९३ तर टी-२० सामन्यांमध्ये १७५९ धावा केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्येही तो तरबेज आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा फॉर्म खालावला आहे. परिणामी त्याला भारतीय संघात स्थान टिकवता येत नाही आहे.
आयपीएलमध्ये तो अनेक संघांकडून खेळला आहे. सध्या तो पंजाबच्या संघामध्ये आहे. अनेक विक्रम करणारा शिखर धवनचे खासगी आयुष्य चर्चेत होते. काही महिन्यापूर्वी शिखर आणि त्यांची पत्नी आयेशा वेगळे झाले.Read More
Virender Sehwag Reaction On Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानने पुन्हा एकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने…
Operation Sindoor News: विशेष आणि अचूक शस्त्रास्त्रांचा वापरून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे एकाच समन्वित हल्ल्याद्वारे नऊ दहशतवादी ठिकाणे नष्ट…