शहरातील थंडी पुन्हा एकदा वाढली असून, स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी अधिक पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखीही वाढली आहे.
डिसेंबरच्या मध्यापर्यंत फारसा सक्रिय नसलेला स्वाइन फ्लू नववर्षांत पुन्हा परतला आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण २७ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची…