संघ लोकसेवा आयोगाची संकल्पना इ.स.१८५४ साली ब्रिटिशांनी मांडली. त्यानुसार १ ऑक्टोबर १९२६ रोजी संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या आयोगाला Federal Public Service Commission असं संबोधलं जात.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) असे ठेवण्यात आले. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून घेतली जाते. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.
संघ लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्लीमधील धौलपूर हाऊस येथे आहे.Read More
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (युपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आयोगाने एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला.
UPSC DigiLocker: २०२२ मध्ये केंद्रीय प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या पूजा खेडकरवर, परीक्षेला बसण्याचे ९ प्रयत्न संपल्यानंतरही, परीक्षा दिल्याचा आरोप आहे.