विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा जन्म २१ डिसेंबर १९७३ रोजी झाला. ते एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, लेखक आहेत. ते २०१९पर्यंत भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या बोर्डाचे सदस्य होते. तसेच इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्समध्ये भारतीय सिनेमाचे सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत. हार्वर्ड एक्स्टेंशन स्कूलमध्ये अॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमधील विशेष अभ्यासाच्या प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्यापूर्वी अग्निहोत्री यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतले.
‘ताश्कंद फाइल्स’ (२०१९) या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना सर्वोत्कृष्ट पटकथा-संवादांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे 2022 साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचंदेखील प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. त्यांची पत्नी पल्लवी जोशी देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून त्या अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत.Read More
Vivek Agnihotri Explains His Marathi Food Statement : “मला कोणत्या वादात अडकायचं नाही”, मराठी जेवणाबाबत केलेल्या व्यक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण;…
अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर आरोप केला आहे, त्याने चॉकलेट सिनेमाच्या शुटींगदरम्यान गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं आहे. मुलाखतीचा…