Tanushree Dutta Allegation on Viviek Agnihotri : MeToo च्या मोहिमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता काश्मीर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप केला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यामुळे तनुश्री दत्ता चर्चेत आली होती. आता त्याच प्रकारचा आरोप तनुश्री दत्ताने ( Tanushree Dutta ) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर केला आहे.

तनुश्री दत्ताने दिलेली मुलाखत चर्चेत

तनुश्री दत्ता ( Tanushree Dutta ) ही गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने अनेक वर्षांत चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. मात्र नाना पाटेकरांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याने ती चर्चेत आली होती. नाना पाटेकर यांनी शूटिंग सुरु असताना गैरवर्तन केलं असं तनुश्रीने म्हटलं होतं. मात्र नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळले. ढोल, आशिक बनाया आपने, चॉकलेट यांसारख्या सिनेमांमध्ये तनुश्रीने काम केलं आहे. आता तिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप केला आहे. चॉकलेट या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान काय घडलं ते तनुश्रीने सांगितलं आहे. २००५ मध्ये आलेल्या चॉकलेट या सिनेमात इमरान हाश्मी, इरफान, अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा सिनेमा विवेक अग्निहोत्रीने दिग्दर्शित केला होता. आता तनुश्रीने ( Tanushree Dutta ) केलेल्या आरोपांमुळे विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत तसंच तनुश्रीची चर्चा होते आहे.

vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Dharmaveer movie shiv sena hindutva
शिवसेनेतील बंडाचे कारण केवळ हिंदुत्व, ‘धर्मवीर’ मध्ये हेच अधोरेखित
Madgulkar theater, Prashant Damle,
ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाबाबत अभिनेते प्रशांत दामले यांची खंत, म्हणाले…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन

हे पण वाचा- “…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

तनुश्री दत्ताने काय आरोप केले आहेत?

विवेक अग्निहोत्रीसह मी चॉकलेट सिनेमात काम केलं. त्यावेळी सेटवर पोहचायला एक दिवस मला पाच ते दहा मिनिटांचा उशीर झाला. तेव्हा मला अनप्रोफेशनल म्हणत त्यांनी सगळ्यांसमोर माझा पाणउतारा केला. फरीदून शहरयारला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने ही बाब सांगितली. तसंच ती पुढे म्हणाली, “मी संवाद म्हणताना एखादी चूक केली तर मला कायम ऐकवलं जायचं, विवेक मला सणकी आणि वेडसर आहे असंही म्हणाला होता. त्याच्या मनात येईल ते तो बोलायचा.” असं तनुश्री दत्ताने ( Tanushree Dutta ) सांगितलं

सिनेसृष्टीत तक्रार करणाऱ्या अभिनेत्रीचं चरित्र्यहनन केलं जातं

“आपल्या सिनेसृष्टीत जर एखादी मुलगी तक्रार करायला गेली तर तिचं चारित्र्यहनन केलं जातं. मी दहा, पंधरा वर्षांपूर्वी हाच अनुभव घेतला आहे. आजही तसाच अनुभव घेते आहे. मला अकारण नावं ठेवली जात आहेत. आपल्या चुका लपवण्यासाठी मला बदनाम केलं जातं आहे. आम्ही १०० दिवस सिनेमाचं शुटिंग करत होतो. पहिल्या दिवसापासून मी वेळेत यायचे. एक दिवस मला उशीर झाला तेव्हा मला तो खूप ओरडला. माझं शुटिंग नसेल तरीही मला बोलवलं जायचं. मला व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाण्याची संमती नव्हती. मी दहा मिनिटं जर व्हॅनिटीमध्ये बसले तर मला आराम करण्याची संमती नव्हती. मला शॉर्ट कपडे दिले गेले होते. त्यावेळी मला रोब घालण्याचीही संमती नव्हती. शॉर्ट स्कर्टमध्ये मला सगळ्यांसमोर बसायला लावायचा. मला काही तक्रार करण्याची मुभा नव्हती. असा आरोप तनुश्री दत्ताने ( Tanushree Dutta ) केला आहे.

Actress Tanushree Dutta
अभिनेत्री तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप केले आहेत. (फोटो-तनुश्री दत्ता, इन्स्टाग्राम पेज)

मी एक दिवस पाहिलं एक मुलगी विवेकच्या मांडीवर बसली होती

“मी चॉकलेट सिनेमासाठी निवडले गेले. तिथे इतर मुलींची स्क्रीन टेस्ट सुरु होती. मला माहीत होतं की मला सिनेमातून काढलं जाणार नाही कारण माझी निवड निर्मात्यांनी केली होती. अशात इतर मुलींच्या स्क्रीन टेस्ट सुरु होत्या. माझ्यासाठी व्हॅनिटी व्हॅन होती त्या मुलींसाठी एक कॉमन रुम तयार करण्यात आली होती. एकदा मी तिथून जाताना पाहिलं एक मुलगी विवेक अग्निहोत्रीच्या मांडीवर बसली होती. मला वाटलं की हे काय आहे? मला तेव्हा माहीत होतं की विवेक अग्निहोत्रीला मला सिनेमात घ्यायचं नव्हतं. मला पाहून त्याने दार लावून घेतलं. पण तो किती घाणेरडा विचार करतो हे मला तेव्हाच कळून चुकलं होतं. मी त्याच्या सिनेमात काम करताना माझ्या डोक्यावर टांगती तलवार असायची की मी चुकले की मला ओरडायचा. मला शॉर्ट स्कर्ट घालून चालले होते तेव्हा विवेक अग्निहोत्री म्हणाला की तुझे पाय आणि मांड्या एकदम सेक्सी आहेत. विवेक अग्निहोत्री त्याच्या असिस्टंट्स वगैरे होत्या त्यांच्यासह बिझी असायचा. पल्लवी जोशी कायम तिथे नसायच्या. मात्र हा अतिशय घाणेरडा आणि किळसवाणा माणूस आहे हे मला तेव्हाच समजलं होतं.” असंही तनुश्री दत्ताने ( Tanushree Dutta ) सांगितलं.