पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
Women Drinking Alcohol: पोलीस अधिकारी म्हणाले की, गेल्या वर्षीच्या कालीपूजेच्या मिरवणुकीत दारू पिऊन सहभागी झालेल्या तरुणींना पाहून त्यांना “लाज” वाटली.
UGC Fake Universities : यूजीसीच्या यादीनुसार सर्वाधिक १० बनावट विद्यापीठे दिल्लीमध्ये तर महाराष्ट्र व पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे.