-
क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याने त्याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थिती लावली होती. पण यावेळी तो माध्यमांशी संवाद न साधताच तेथून निघून गेला. ट्रेलर लाँचवेळी संपूर्ण हॉल धोनीच्या चाहत्यांनी भरला होता. सर्वजण धोनीचे नाव घेत शिट्ट्या वाजवत होते.
-
काही पत्रकारांनी चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडे याला धोनी माध्यमांशी संवाद न साधताच का निघून गेला असा प्रश्न केला. त्यावर नीरज म्हणाला की, हे माझे काम नाही. तसेच ही काही माझी जागा नाही की त्याच्यावतीने मी उत्तर देऊ शकेन. तो एक स्वतंत्र व्यक्ती असून त्याची स्वतःची चॉइस आहे. तो का निघून गेला ते मला माहित नाही. तसेच हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकत नाही कारण याचे उत्तर देण्यासाठी मी चुकीचा व्यक्ती आहे. त्याच्यावतीने मी तुमची माफी मागतो.
-
चाहत्यांच्या मोठ्या जमावाने धोनीचे जंगी स्वागत केले. त्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पण, प्रसारमाध्यमे काही प्रश्न करण्यापूर्वीच धोनी तिथून निघून गेला.
धोनीने स्वतः या चित्रपटाची सह निर्मिती केली असून यात सुशांत सिंग राजपूत त्याच्या भूमिकेत दिसेल. जालंधर, दिल्ली आणि मुंबई या तीन शहरांमध्ये चित्रपटाचा ट्रेलर धोनीच्या हस्ते लाँच करण्यात येत आहे. -
कॅप्टन कूलच्या जीवनावर साकारलेल्या या चित्रपटामध्ये अनुपम खेर, भूमिका चावला, कियारा आडवाणी यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.
-
३० सप्टेंबर रोजी ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.

Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी