-
सध्या युट्यूबवर आपल्या गावरान भाषेतील व्हिडीओंनी विनायक माळी या तरुणाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. (सर्व फोटो – विनायक माळी इन्स्टाग्राम)
-
आगरी भाषेत असणारे हे व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मोठ्या प्रमाणात ते शेअरही होत आहेत.
-
आजकालचे तरुण टिकटॉक, फेसबुक, ट्विटरवर रमत असताना विनायक माळी याने याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
त्याची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, त्याला आगरी किंगही म्हटलं जातं.
-
विनायक माळीबद्दल अशाच अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत
-
२२ सप्टेंबर १९९५ ही विनायक माळीची जन्मतारीख आहे.
-
रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये त्याचा जन्म झाला.
-
विनायक माळीचा जन्म आगरी कुटुंबात झाला आहे.
-
विनायक माळीचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्याचे वडील ठाण्यात वास्तव्यास गेले.
-
विनायक माळीने त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातच केलं आहे.
-
विनायक माळी युट्यूबवर धुमाकूळ घालत असला तरी शिक्षणाकडेही तो तितकाच गांभीर्याने पाहत आहे.
-
विनायक माळी सध्या एलएलबीचं शिक्षण घेत आहे.
-
-
-
वकिलीचं शिक्षण घेत असतानाच विनायक माळीला Wipro कंपनीत नोकरी लागली होती.
-
-
-
पण वैयक्तिक कारणांमुळे विनायक माळीने ही चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली.
-
यानंतर त्याने शिक्षण पूर्ण करुन युट्यूबवर व्हिडीओ अपलो़ड करण्याचा निर्णय घेतला.
-
विनायक माळी आज इतका प्रसिद्ध असला तरी त्याला ही प्रसिद्धी काही एका रात्रीत मिळालेली नाही.
-
-
यासाठी त्याला अनेक कष्ट घ्यावे लागलेले असून एका कार्यक्रमात बोलताना त्याने याचा उल्लेख केला होता.
-
विनायक माळी याने सुरुवातीला युट्यूबवर हिंदी भाषेत व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली होती. पण त्याला त्यात अपेक्षित यश मिळालं नाही.
-
आधी आपण हिंदी भाषेत व्हिडीओ करायचो. तेव्हा कोणीही पाहायचं नाही. पण नंतर आपण आपल्या भाषेत आपल्या लोकांसाठी व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा यश मिळालं असं तो सांगतो.
-
विनायक माळीचे युट्यूबवर सध्या ८ लाख ५१ हजार फॉलोअर्स आहेत.
-
युट्यूबकडून विनायक माळीला सिल्व्हर बटणही देण्यात आलं आहे.
-
विनायक माळीच्या व्हिडीओंना युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात.
-
विनायक माळीची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, टिकटॉकवरी त्याच्या आवाजातील व्हिडीओ उपलब्ध आहेत. अनके तरुण-तरुणी त्यावर व्हिडीओ रेकॉर्ड करुन शेअर करताना दिसतात.
-
विनायक माळीचे टिकटॉकवर १ लाख २३ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत.
-
तर इन्स्टाग्रामवर ८८ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत.
-
विनायकला अभिनयासोबत डान्स आणि गाण्याचीही प्रचंड आवड आहे.
-
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटर तो अनेकदा डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो.
-
ऐश्वर्या राय ही त्याची आवडती अभिनेत्री असून अमिताभ बच्चन आवडते अभिनेते आहेत.
-
विनायक माळीच्या प्रसिद्धीची भुरळ आता मराठी चित्रपटसृष्टीलाही पडली आहे.
-
-
नुकतंच 'मन फकिरा' चित्रपटाच्या कलाकारांनी त्याच्यासोबत चित्रपटाचं प्रमोशन केलं.
-
-
विनायक माळी युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातू महिन्याला जवळपास ७० हजार रुपये कमवतो.
-
विनायक माळीची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की त्याला आगरी किंग म्हणतात.
-
पण आपल्याला आगरी किंग नका म्हणत जाऊ असं नम्रपणे तो लोकांना सांगत असतो.
-
-
आपण आगरी किंग नसून प्रत्येकाच्या घरातील..आपलासा वाटणार विनायक माळी असल्याचं तो सांगतो.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक