-
Amazon Prime वर सध्या 'मिर्झापूर-२' चा बोलबाला आहे. या सिरिजमध्ये गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन दिलेल्या शबनमची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
पहिल्या सिझनच्या उल्लेखनीय यशानंतर मिर्झापूर वेब सिरिजचा दुसरा सिझन नुकताच रिलिज झाला.
-
मिर्झापूरची क्रेझ पाहता याच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहणारा प्रचंड मोठा चाहतावर्ग होता. या चाहत्यावर्गाने दुसरा सिझन चांगलाच उचलून धरला.
-
दुसऱ्या सिझनमध्ये महत्त्वाची पात्र कोण-कोण असतील? हे तर साऱ्यांनाच ठाऊक होतं. पण त्याचसोबत 'सर्प्राइज' एन्ट्री होती शबनमची…
-
पहिल्या सिझनमध्ये अतिशय छोटी भूमिका असलेल्या शबमनला दुसऱ्या सिझनमध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली.
-
'गुड्डू पंडित'सोबतचा तिचा किसिंग सीन चांगलाच गाजला.
-
पण ही शबनम नक्की कोण आहे… हे तुम्हाला माहिती आहे का?
-
शबनमची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव आहे शरनवाज जिजना.
-
शरनवाज दुसऱ्या सिझनमध्ये गुड्डू पंडितबरोबर रोमान्स करताना दिसली.
-
मिर्झापूरच्या आधी शरनवाजने अनेक बेव सिरिजमध्ये अभिनय केला आहे.
-
नुकतीच बँग बाजा बारात या वेब सिरिजमधील तिची गुरप्रीत ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
-
शरनवाज MTV च्या 'लव ऑन रन' या शो मध्ये अभिनय करताना दिसली होती. तसंच तिने अनेक जाहिरांतीमध्येही अभिनय केला आहे.
-
शरनवाजने Dove, Tanishq आणि हिरानंदानी बिल्डर्स यांसारख्या बड्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये अभिनय केला आहे.
-
शरनवाजचा जन्म मुंबईतला आहे. तिचे वडील व्यावसायिक आहेत.
-
शरनवाजनेही शिक्षण संपवून व्यवसायात वडिलांना मदत करण्याचा विचार केला होता. पण तिला अभिनय क्षेत्रात संधी मिळाल्याने तिने तो विचार सोडून दिला. (सर्व फोटो- शरनवाज जिजना इन्स्टाग्राम)

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…