-
लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा.
साहजिकच तो प्रत्येकाला थाटामाटात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर हिने नुकतीच तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली. सईने सोशल मीडियावर या बंगाली विवाहसोहळ्याचे अप्रतिम फोटो पोस्ट केले आहेत. देखण्या सजावटी, फुलांचा मनमोहक वापर, साडी परिधान करण्याची वैशिष्टय़पूर्ण पद्धत, साडय़ांची रंगसंगती, फुलांची आरास, मुंडावळ्यांचे प्रकार आणि महिलांकडून तोंडाने काढला जाणारा विशिष्ठ ध्वनी या सगळ्याच गोष्टी अलौकिक लग्नपद्धतीचा अनुभव दिल्याशिवाय राहात नाही. बंगाली विवाहाच्या याच पद्धती खूप महत्त्वाच्या आणि सुखद अशा आहेत. लग्नासाठी नवरामुलगा आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी घंटा, शंख यांच्या माध्यमातून सुमधुर नाद निर्माण करून, पायावर पाणी घालून त्याचे स्वागत केले जाते. गोड मिठाई भरवून त्याला घरात घेतले जाते. लग्नमंडपामध्ये वराचा प्रवेश झाल्यानंतर पुरोहित धार्मिक पूजा आणि विधी पूर्ण करतात. सईने बंगाली वधूप्रमाणे नीर डोल दागिने परिधान केले. साडी, नीर डोल दागिने, भुवयांवर चंदनाचे ठिपके, भांगेत सोन्याचा दागिना, डोक्यावर मुकूट, नथ असा सईचा साज पाहायला मिळतोय. -
तीर्थदीप व सईसोबत तिचे आई-बाबा
-
तीर्थदीपच्या आईसोबत सई
-
लग्नसमारंभात सईने बहिणीसोबत केलेला डान्स
-
सई लोकूर- तीर्थदीप रॉय
-
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सई लोकूर

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक