-
‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’, ‘कहानी’, ‘सुलू’, ‘बेगमजान’, 'मिशन मंगल', 'शकुंतलादेवी' या चित्रपटानंतर कलाविश्वामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (सर्व फोटो सौजन्य – विद्या बालन / इंस्टाग्राम)
-
विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याचा अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर झिरो फिगर या संकल्पनेला छेद देण्यास विद्या यशस्वी ठरली. त्यामुळे आज लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्याचा आवर्जुन नाव घेतं जातं.
-
मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
अभिनेत्री विद्या बालनने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विद्याने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या लाँग ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. 'चांगले कपडे घाला… आणि घरी बसा…' असे कॅप्शन देत अभिनेत्री विद्या बालनने हा फोटो शेअर केला आहे. विद्या बालनच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान