-
साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा हेगडेने पुन्हा एकदा आपल्या फॅन्ससोबत साडीमधला हॉट लूक शेअर केलाय. अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तसंच ती स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील बरीच चर्चेत असते. नुकतंच तिने आपला साडीमधला लूक शेअर करत बोल्डनेसचा तडका लावला आहे. तिच्या या लूकमधील फोटोज सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
अभिनत्री पूजा हेगडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. तिचे साडीमधले हे फोटोज पाहून तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील असेच आहेत. साडी परिधान केल्याने पूजाच्या सौंदर्याला चारचॉंद लागले आहेत.
-
तिचा हा नवा एथनिक लूक परफेक्शनने भरलेला आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी तिने नेसली आहे. व्हाइट-गोल्डन आणि सिल्वर शिमरी एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साडीवर डीप कट आणि पिवळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केलाय.
-
सोबतच तीने केसांवर एक बन बांधल्यामुळे तिचा परफेक्ट लूक खुलून दिसतोय. सोबतच कानांमध्ये अनमोल ज्वेलर्सचे मोठ्या आकाराचे झुमके, हिऱ्यांच्या बांगड्या आणि बोटांमध्ये अंगठीने तिच्या साडीमधल्या लूकला पूर्ण केलंय.
-
अभिनेत्री पूजा हेगडेच्या चाहत्यांना तिचा हा नवा लूक खूपच आवडलाय. तिचे साडीमधले फोटोज सोशल मीडियावर सध्या धुमाकुळ घालत आहेत. तिच्या या फोटोजवर फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
-
अभिनेत्री पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती 'बाहूबली' फेम सुपरस्टार प्रभाससोबत 'राधेश्याम' चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती 'थलपति ६५' मध्ये काम करणार आहे. (Photo: Instagram/hegdepooja)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली