छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो असा टॅग प्राप्त केलेला ‘बिग बॉस’हा शो यंदाच्या सीजनला आपला प्लॅटफॉर्म बदलणार आहे. यंदा 'बिस बॉस'चा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे आणि नंतर तो टीव्हीवर प्रदर्शित होइल. या ओटीटी 'बिग बॉस'च सूत्रसंचालन कोण करणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. तशी काही नावं देखील समोर आली आहेत. (Photo-Filed Photo) शहनाझ गिल- 'बिग बॉस १३'ची लोकप्रिय स्पर्धक म्हणजे शहनाझ गिल. 'बिग बॉस १३'मध्ये तिने तिच्या बबली अंदाजात सगळ्यांच मनोरंजण केलं होतं. यंदाच्या या नवीन ओटीटी व्हरजनमध्ये फॅन्सना शहनाझला होस्ट करताना बघायचं आहे. (Photo-Shenaaz Gill Instagram) सिद्धार्थ शुक्ला- 'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्ला आहे. १४व्या सीजनमध्ये एका दिवासासाठी सिद्धार्थने शो होस्ट केला होता. त्यानंतर आता ओटीटीवर सिद्धार्थ शुक्ला होस्ट म्हणून हवा अशी चर्चा रंगतान दिसत आहे. (Photo-Siddharth Shukla Instagram) फराह खान- फिल्ममेकर फराह खानने खूपदा सलमान खानची जागा घेतली आहे. त्यामुळे 'बिग बॉस १५' ओटीटी व्हरजनमध्ये फराह खान होस्ट करताना दिसू शकते. (Photo-Farha khan Instagram) गौतम गुलाटी – गौतम गुलाटीचा फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. गौतम 'बिग बॉस ८'चा विजेता असून तो हा शो होस्ट करू शकतो. (Phtoto-Gautam Gulati Instagram) अक्षय कुमार- या सगळ्या नावांमध्ये अजून एक नावं समोर येत आहे ते म्हणजे खिलाडी कुमार अक्षयचं. अक्षयच्या फॅन्सना त्याला हा शो होस्ट करताना बघायच आहे. (Photo-Akshay Kumar Instagram) रोहित शेट्टी-'खतरों के खिलाडी' नंतर आता रोहितच्या फॅन्सला 'बिग बॉस' ओटीटीमध्ये त्याला होस्ट करताना पहायच आहे. (Photo- Rohit shetty Instagram) -
सलमान खान- तसं सोशल मीडियावर एक वर्ग असा पण आहे जो सलमान होस्ट नसेल तर 'बिग बॉस' बघणार नाही. त्यामुळे 'बिग बॉस' ओटीटी व्हरजन देखील सलमानच होस्ट करताना दिसेल असे अंदाज लावले जात आहेत. (Photo-Salman Khan Instagram)

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, पाक दहशतवादी तळांवर हल्ले