-
'मनी हाइस्ट'चा शेवटचा सिझन प्रदर्शित होण्यासाठी एकदिवस राहिला आहे. उद्या म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात की 'मनी हाइस्ट' ही सीरिजचा पाचवा सिझन भारतात कधी आणि केव्हा प्रदर्शित होणार आहे.(Photo-Loksatta File Images)
-
'मनी हाइस्ट' ही स्पॅनिश सीरिज असून त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. स्पॅनिश व्यतिरिक्त ही सीरिज इतर अनेक भाषेत पाहू शकतात. (Photo-Loksatta File Images)
-
ही वेब सीरिज भारतात दुपारी प्रदर्शित होईल. (Photo-Loksatta File Images)
-
‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजचे मूळ नाव ‘कासा डी पॅपेल’ आहे. हा एक असा शो आहे ज्याचा पहिला सिझन प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता. (Photo-Loksatta File Images)
-
या सीरिजचा दूसरा सिझन संपल्यानंतर जेव्हा नेटफ्लिक्सने याचे जागतिक पातळीवर प्रदर्शित करायचे अधिकार विकत घेतले तेव्हा या सीरिजला नवीन जीवन मिळाले. नेटफ्लिक्सवर ही सीरिज स्पॅनिश भाषेत होती, बघता बघता या शोची लोकप्रियता वाढली आणि याचे डब् व्हर्जन देखील आले.(Photo-Loksatta File Images)
-
या सीरिजच्या कलाकारांना आणि क्रू ला ‘कासा डी पॅपेल’च्या सेटवर परत येण्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी घेतलेली मेहनत स्पॅनिश प्रेक्षकांना फारशी आवडली नाही. (Photo-Loksatta File Images)
-
'मनी हाइस्ट'चा पाचवा सिझन दोन खंडात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला खंड ३ सप्टेंबर तर दुसरा खंड बरोबर तिन महिन्यांनी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo-Loksatta File Images)
-
'मनी हाइस्ट'चा पहिला खंड ३ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल. याचा दुसरा खंड ३ डिसेंम्बर रोजी दुपारी १.३० वाजता प्रदर्शित करण्यात येईल.(Photo-Loksatta File Images)
-
ही सीरिज एकूण १० एपिसोडेसची असणार आहे. ज्या पाच पाचच्या २ भागात विभागण्यात आले आहे.(Photo-Loksatta File Images)
-
यात पहिल्या सिझनच्या कास्ट बरोबर अनेक नवीन चेहरेही तुम्हाला बघायला मिळणार आहेत. (Photo-Loksatta File Images)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती