-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
-
प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
प्रियांकाने आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबतचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
-
मात्र गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि प्रियांका हे एकत्र काम करताना दिसत नाही. यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
फक्त अक्षय नव्हे तर सलमान, शाहरुख आणि आमिर खान हे तिघेही तिच्यासोबत काम करताना दिसत नाही.
-
यामुळे तिला अनेक बिग बजेट हिंदी चित्रपटात काम मिळत नसल्याचे बोललं जात आहे.
-
प्रियांकाने जेव्हा तिच्या बॉलिवूड करियरला सुरुवात केली तेव्हा तिने अक्षय कुमारसोबत अनेक हिट चित्रपटात काम केले. या दोघांची जोडी सुपरहिट म्हणून ओळखली जायची.
-
पण यादरम्यान ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या. यामुळे मात्र संपूर्ण वातावरण बिघडलं.
-
यानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने प्रियांकासोबत काम करु नकोस, अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर अक्षय कुमारने तिच्यासोबत चित्रपटात काम करणं नाकारलं. त्यानंतर प्रियांका-अक्षय ही जोडी चाहत्यांना पडद्यावर दिसली नाही.
-
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राने सलग दोन वर्ष एकत्र काम केले आहे. कोणत्याही अवॉर्ड शोच्या अँकरिंग असो किंवा आयपीएल मॅचेस हे दोघेही एकत्र असायचे.
-
त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी सुरु आहे, अशा चर्चांना उधाण आले होते.
-
या चर्चांमुळे शाहरुखची पत्नी गौरी फार नाराज झाली. यानंतर शाहरुखने घर जोडलेलं राहावं, यासाठी प्रियांकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.
-
प्रियांकाने सलमानसोबत ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ आणि ‘मुझसे शादी करोगी’, यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र प्रियांकाने सलमान सोबत ‘मिसेस खन्ना’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यामुळे सलमान राग आला.
-
यासर्व प्रकरणानंतरही सलमानने पुन्हा एका चित्रपटात प्रियांकाला एका चित्रपटातील छोटीशी भूमिकेसाठी ऑफर दिली होती. मात्र तेव्हाही तिने त्याला नकार दिला. त्यामुळे सलमानने प्रियांकाला कोणत्याही चित्रपटासाठी विचारायचे नाही, असे ठरवले.
-
या प्रकरणानंतर प्रियांकाने सलमानशी मैत्री करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण आतापर्यंत ती सलमानच्या कोणत्याही चित्रपटात दिसत नाही.
-
दरम्यान अनेक वर्षानंतर सलमानने प्रियांकाला ‘भारत’ चित्रपटासाठी विचारले होते. पण अगदी शेवटच्या क्षणी प्रियांकाने हा चित्रपट सोडला. त्यानंतर मात्र अद्याप ते दोघेही एकत्र दिसलेले नाहीत.
-
प्रियांका आणि आमिर यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात काम केलेले नाही. आमिर खान आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. मात्र त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी फार कमी अभिनेत्रींना मिळाली आहे.
-
आमिर आणि प्रियांकामध्ये काही कारणात्सव वाद असल्याचे बोललं जात आहे. अनेकदा आमिरला तिचे नाव सुचवले असता, त्याने स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे.

फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या